Home » ठळक बातम्या » आ.पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

आ.पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

आ.पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांचा जाहीर पाठिंबा

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सैदापूर येथे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करत सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला. स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा म्हणून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा देशभरात लौकिक आहे. त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा निश्चय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केला आहे. 

आ. चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कृतिशील कार्यातून कराडला जोडणारे रस्ते केल्यामुळे विकासाला मोठी गती आली. रस्त्यांच्या जाळ्यामुळे परिसराचे नंदनवन झाले. कराड ते ओगलेवाडी व मसूर या दोन्ही रस्त्यांमुळे सैदापूर परिसराचा कायापालट झाला आहे. आ. चव्हाण यांचे हे कार्य विसरता येत नाही.

त्यामुळे सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव व त्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आ. चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील प्रचार शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात नारळ फोडण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकऱ्यांनी गावातील सर्व मंदिरे, मशीद तसेच बौद्ध विहार येथे जावून दर्शन घेवून प्रचार शुभारंभ केला. 

सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव, ज्येष्ठ नेते धनाजीराव जाधव (आण्णा) व मानसिंगराव जाधव (नाना) यांच्यासह कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय पक्का झाल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 21 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket