दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पनाला
महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे तीन मार्च 2024 रोजी होणार मतदान.
आता एकूण तेरा जागांसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २७ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक होणार हे निश्चित झाले. एकूण १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सर्वसाधारण प्रवर्गाच्या आठ जागांसाठी माजी अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, राजेश कुंभारदरे, समीर सुतार, युसुफ शेख, चंद्रकांत बावळेकर, बाळकृष्ण कोंढाळकर या विद्यमान संचालकांसह सतीश ओंबळे, विजय साळवी, राजेंद्र पवार, गजानन फळणे, शरद बावळेकर, नदीम शारवान, इरफान शेख, संपत जाधव, सैफ वारुणकर असे १५ दिग्गज उमेदवार रिंगणामध्ये उरले आहेत. येणाऱ्या कालावधीत महाबळेश्वर नगरपालिकेचेही इलेक्शन होणार असून दिग्गज आणि आत्तापासूनच तयारी केलेली दिसून येत आहे.