Home » गुन्हा » राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे

प्रतिनिधी :तानाजी सावंत यांच्या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटून मुलगा जबर जखमी झाल्याची घटना पुण्यातील धनकवडी येथे घडली आहे. पोलिसांनी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरु केला आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या बंदूकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मंत्री सावंत यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने कपाटामध्ये ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागला आणि सुरक्षारक्षकाच्या घरातच गोळीबार झाला. या घटनेमध्ये त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील धनकवडीमधील वनराई कॉलनी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मंत्री सावंत यांचा सुरक्षारक्षक नितीन शिर्के यांनी रिव्हॉल्वर एका बॅगेमध्ये भरुन कपाटामध्ये ठेवले होते. त्या बॅगेला मुलाचा धक्का लागला आणि बॅग खाली पडली त्यामध्ये रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून त्यांचा मुलगा अभय शिर्के (वय 13) जबर जखमी झाला आहे. या घटनेमुळे शिर्के यांच्या विरोधामध्ये पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 26 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket