Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » दि.गुजराथीच्या सोने तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा चेअरमन विनोद कुलकर्णी यांचे आवाहन

दि.गुजराथीच्या सोने तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा चेअरमन विनोद कुलकर्णी यांचे आवाहन

दि.गुजराथीच्या सोने तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा चेअरमन विनोद कुलकर्णी यांचे आवाहन

प्रतिनिधी-दि. गुजराथी अर्बन को-ऑप व्रेडीट सोसायटी लि.ला 100 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रात 100 वर्ष पूर्ण झालेल्या मोजक्याच संस्था आहेत. त्यापैकी एक संस्था म्हणजे आपली गुजराथी अर्बन आहे. या संस्थेच्या माध्यमातून सभासद, कर्जदारांसाठी सोने तारण योजना जाहीर केली आहे. सोने तारणावर कर्ज मिळणार आहे. त्याचा लाभ ठेवीदार, सभासद, कर्जदारांनी घ्यावा, असे आवाहन दि. गुजराथी अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी केले.  

दि. गुजराथी अर्बन को-ऑप व्रेटीड सोसायटी लि.च्या मुख्य कार्यालयात सोने तारण कर्ज योजनेचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत व व्हाईस चेअरमन अॅङ चंद्रकांत बेबले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी संचालक रामचंद्र साठे, वजीर नदाफ, जयंतीलाल तपासे, संजय माने, तुषार महामुलकर, विशाल कदम, व्यवस्थापक सतीश घोरपडे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन विनोद कुलकर्णी म्हणाले, दि. गुजराथी अर्बन संस्थेला एक आगळीवेगळी 100 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या संस्था 100 वर्षाच्या आहेत त्यामध्ये गुजराथीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. याच संस्थेने सभासद, ठेवीदार, कर्जदारांसाठी सोने तारण कर्जाची योजना सुरु केली आहे. त्यासाठी सर्वात कमी व्याजदर असून महिन्याला 0.75 पैसे व्याजदर आहे. कोणतीही प्रोसिसिंग फी लागणार नाही, स्टॅम्पची गरज लागणार नाही, चोख सोन्यावर सर्वाधिक कर्ज देणारी ही योजना सभासदांच्या कर्जदारांच्या हिताची सुरु करण्यात आलेली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अॅङ चंद्रकांत बेबले म्हणाले, गुजराथी अर्बन हे एक कुटुंब आहे. कुटुंबातल्या नात्यानेच ही योजना पुढे आणली असून ही योजना गरजूंसाठी चांगली आहे.

कोणताही त्रास न घेता पटकन सोने तारणावर कर्ज गुजराथी अर्बनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रती 10 ग्रॅमसाठी सर्वाधिक 75 हजार रुपयांचे कर्ज घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरीत नजिकच्या शाखेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन केले. सतीश घोरपडे यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 8 कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तर्फे सोलापूरमधील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात . एकतेचे प्रतीक म्हणून, कराडमधील कोटा

Live Cricket