दि ग्रेट जावली -महाबळेश्वर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येथील श्री. भैरवनाथ विद्यालयात मोफत वह्या वाटप व नागरिकांना चष्मे वाटप
केळघर, ता:१०:देशाची प्रगती व्हायची असेल तर गरिबांची मुले पुढे गेली पाहिजेत. त्यांना पुढे घेऊन जायचे असेल तर त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत दिले पाहिजे या धोरणानुसार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या १७व्या वर्षांपासून ठाणे, पालघर, रत्नागिरी ,रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वैद्यकीय, शिक्षण सेवा, करिअर सेवा,महिला सक्षमीकरण या उपक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून संस्थेचे हे उपक्रम आदर्शवत आहेत. तसेच दि ग्रेट जावली महाबळेश्वर प्रतिष्ठान ही विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून सातारा जिल्ह्यातील दुर्गम विभागात या संस्थांनी काम करावे, शिवसेनेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिली.
शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे हे संस्थापक असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच दि ग्रेट जावली -महाबळेश्वर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येथील श्री. भैरवनाथ विद्यालयात मोफत वह्या वाटप व नागरिकांना चष्मे वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे ठाणे शहरप्रमुख परेश कारंडे, दि ग्रेट जावळी-महाबळेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर दळवी, सचिव विकास दळवी, वेण्णा निरंजना पतसंस्थेचे संचालक विनोद शिंगटे,भैरवनाथ विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र गाडवे, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव, केळघर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा धनावडे,शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन शेलार,केळघर शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब शिर्के,डॉ. उदय गोपाले आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने भैरवनाथ विद्यालयातील व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व अल्पोपहार चे वाटप करण्यात आले. परेश कारंडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.विकास दळवी यांनी दि. ग्रेट जावली-महाबळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संस्थेच्या वतीने कै. अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयात म्हाते बुद्रुक विद्यालय, म्हाते खुर्द, म्हाते बुद्रुक, वागदरे,गोंदेमाळ, भामघर,म्हाते मुरा शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या व नागरिकांना मोफत चष्मे वाटण्यात आले. ग्रेट जावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर दळवी यांनी आभार मानले.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व दि ग्रेट जावली-महाबळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप प्रसंगी एकनाथ ओंबळे. समवेत परेश कारंडे, शंकर दळवी, विकास दळवी, विनोद शिंगटे व शिक्षक
जिजाऊ प्रतिष्ठान राज्यात विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून समाजातील सर्व घटकांना विविध योजनांचा लाभ या संस्थेकडून देण्यात येत आहे. भविष्यात मेढा या तालुक्याच्या ठिकाणी संस्था स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असून शिवसेनेच्या वतीने या केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करणार आहे:
एकनाथ ओंबळे:सातारा जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख




