Home » खेळा » यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील) यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

  दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी पंचायत समिती वाई येथील देशभक्त किसन वीर सभागृहात यशस्वी विद्यार्थी गुणगौरव समारोह मोठ्या उत्साहात पार पडला.स्व. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा,स्व. यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा,स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा

या स्पर्धांमध्ये जिल्हा पातळीवरील वैयक्तिक तसेच सांघिक 85 यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुका मेवा व पाण्याची सिंगल वॉल स्टील बॉटल अशी आगळीवेगळी भेट देऊन गौरविण्यात आले. याच आठवड्यात दिनांक 5 व 6 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या अन् लगेचच चौथ्या दिवशी एवढ्या तत्परतेने कौतुक बहुधा जिल्ह्यात सर्वात आधी वाई तालुक्यातच पार पडले असेल.

या कौतुक समारंभासाठी सुट्टीचा दिवस असूनही सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ शबनम मुजावर , वाई तालुक्याच्या नायब तहसीलदार सौ वैशाली जायगुडे आणि वाई तालुक्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ्ज्ञ डॉ. महेश मेनबुधले उपस्थित होते.सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमामध्ये ओहळी शाळेच्या

ओवी नवनाथ मालुसरे

अर्णव आशिष सणस

करिश्मा संदीप वाडकर 

या बालचमूने स्व यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा अंतर्गत प्रश्नमंजुषा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याने सन्मानित होण्याची संधी मिळाली. 

सगळ्यात आश्चर्याचा धक्का म्हणजे वाई तालुक्यातील डोंगराळ, भौगोलिक दुर्गमता, व वाई तालुक्याचे शेवटच्या टोकाचे गाव अन् अवघ्या 16 पटाच्या शाळेने प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने जरीचा फेटा घालून मान्यवरांच्या हस्ते श्री नवनाथ मालुसरे व ,श्रीम. वैशाली मालुसरेंच्या या उभयतांना सन्मानित करण्यात आले. अशा प्रोत्साहनपर गौरव समारोहांमुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच अधिक उत्तेजना मिळेल यात शंकाच नाही. 

             कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर , यशस्वी विद्यार्थी ,शिक्षक व पालक या सर्वांना मिष्टान्न म्हणून खास तुपातील उकडीचे मोदक देऊन कार्यक्रमाचा गोड शेवट करण्यात आला.

           या संपूर्ण कार्यक्रमाची यशस्विता वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री सुधीरजी महामुनी , शिक्षण विस्तार अधिकारी वाळेकर , केंद्रप्रमुख सौ भांगरे यांनी कार्यक्रमाचे अचूक नियोजन केले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना

ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना सातारा : बांधकाम व बिनशेती प्रकरण देणे जलद गतीने होणेसाठी शासनाने ऑनलाईन

Live Cricket