प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी मा. श्री विजय रत्नराज ढमाळ व व्हा.चेअरमनपदी मा. श्री. नितीन विठोबा फरांदे यांची सर्वानुमते निवड
सातारा :-महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते मा. उदय शिंदे व अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व नेते मा. सिध्देश्वरजी पुस्तके यांचे नेतृत्वा खाली प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि. साताराचे चेअरमनपदी मा. श्री. विजय रत्नराज ढमाळ व व्हा. चेअरमनपदी मा. श्री. नितीन विठोबा फरांदे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
बँकेचा कारभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते मा. उदय शिंदे, व आखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व नेते मा. सिध्देश्वर पुस्तके, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त चिटणीस मा. दिपक भुजबळ, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा. विश्वंभर रणनवरे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सातारा जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन या पदाची निवडणूक अध्यासी अधिकारी श्री. संजय जाधव, सहाय्यक निबंधक (२), अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १३-०१-२०२६ रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात होवून बँकेचे चेअरमनपदी मा. श्री. विजय रत्नराज ढमाळ व व्हा. चेअरमनपदी मा. श्री नितीन विठोबा फरांदे यांची निवड करण्यात आलेचे मा. संजय जाधव यांनी घोषीत केले.
नवनिर्वाचित चेअरमन मा. श्री. विजय रत्नराज ढमाळ व व्हा. चेअरमन मा. श्री. नितीन विठोबा फरांदे यांचा सर्व मार्गदर्शक नेते व संचालक सदस्य यांनी निवडी बद्दल सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
बँकेच्या पारदर्शक कारभारासाठी कटिबध्द राहू… विजय ढमाळ
सत्कारास उत्तर देताना नवनिर्वाचित चेअरमन मा. श्री. विजय रत्नराज ढमाळ यांनी बँकेचा कारभार पारदर्शक कारभारासाठी कटिबध्द राहू तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला मोठा नाव लौकिक आहे या नाव लौकिकाला शोभेल असे काम करणार आहे. तसेच सभासद हित कायम डोळयासमोर राहिल हेच उद्दिष्ट आहे.
नवनिर्वाचित चेअरमन श्री विजय ढमाळ व व्हा. चेअरमन मा. श्री. नितीन विठोबा फरांदे यांनी सर्वांचे आभार मानून सर्वांच्या विचाराने व मार्गदर्शनाखाली कारभार करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बँकेचे माजी चेअरमन मा. सौ. पुष्पलता संजय बोबडे, माजी व्हा. चेअरमन मा. श्री. संजीवन रामचंद्र जगदाळे, संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, किरण यादव, सौ निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, विजय बनसोडे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब भोसले तसेच सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




