Home » राज्य » बदल हवा तर चेहरा नवा,भिलार गणातून पूनम निलेश गोळे यांची उमेदवारी जाहीर

बदल हवा तर चेहरा नवा,भिलार गणातून पूनम निलेश गोळे यांची उमेदवारी जाहीर

बदल हवा तर चेहरा नवा,भिलार गणातून पूनम निलेश गोळे यांची उमेदवारी जाहीर

पाचगणी प्रतिनिधी -महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलार गणातून कासवंड गावच्या सुशिक्षित उमेदवार पूनम निलेश गोळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. रखडलेल्या विकासाला गती देणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे तसेच शेतकरी व सर्वसामान्य मतदारांचा सर्वांगीण विकास साधणे, हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पूनम गोळे यांच्या घोषणेमुळे भिलार गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रस्थापित नेत्यांसमोर एक सक्षम व पर्यायी नेतृत्वाचे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीत पूनम गोळे बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

भिलार गण व गटात गेल्या अनेक वर्षांपासून त्याच-त्याच चेहऱ्यांमुळे मतदारांमध्ये नाराजी दिसून येत असून, ‘बदल हवा तर चेहरा नवा’ या भूमिकेतून पूनम गोळे यांचे नाव पुढे आले आहे. संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, ‘जिथे जिथे अन्याय-अत्याचार, तिथे तिथे पूनमताई’ अशी प्रतिमा त्यांनी आपल्या कामातून घडवली आहे. पती निलेश गोळे यांच्या साथीने त्यांनी भिलार गणात सामाजिक व राजकीय पातळीवर झंझावात निर्माण केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket