Home » देश » अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक

अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक

अपक्ष डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची ठसठशीत कामगिरी; २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक

सातारा प्रतिनिधी :बिग बॉस फेम डॉक्टर अभिजीत वामनराव आवाडे ऊर्फ बिचुकले यांनी यावेळी सातारा नगराध्यक्ष पदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली. कोणत्याही मोठ्या पक्षाचे पाठबळ नसताना आणि कोणताही गाजावाजा न करता त्यांनी तब्बल २,७७२ मते मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे.

नगराध्यक्ष पदासाठीच्या या लढतीत डॉक्टर अभिजीत बिचुकले यांना सर्वसामान्य मतदारांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी ठरला. प्रचारासाठी मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी मिळवलेली मते राजकीय जाणकारांना अचंबित करणारी मानली जात आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेला हा जनसमर्थनाचा कौल त्यांच्या स्वतंत्र ओळखीची साक्ष देणारा ठरतो.

विशेष म्हणजे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये चौथा क्रमांक मिळवणे ही कामगिरी सहजसाध्य नसून, आगामी काळात स्थानिक राजकारणात डॉक्टर अभिजीत बिचुकले यांची दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालामुळे अपक्ष उमेदवारांनाही जनतेचा विश्वास मिळू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 67 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket