कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » राज्यात १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली?

राज्यात १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली?

राज्यात १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली?

मुंबई- राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना त्यातील १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली आहे. या निर्णयामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या १२ महानगरपालिकांमध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, धुळे, उल्हासनगर आणि सांगली यांचा समावेश आहे. यापूर्वी या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र आता युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे संपूर्ण जागा लढवणार आहेत. या फुटीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. परिणामी, सत्ताधारी आघाडीला फायदा होऊ शकतो, कारण विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, काही जाणकारांचा अंदाज आहे की, स्थानिक पातळीवर असलेले असंतोष आणि वैयक्तिक समीकरणे लक्षात घेता विरोधकांना याचा अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात १५ जानेवारी रोजी सर्व महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जात आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तासमीकरणे वारंवार बदलली आहेत. आता युतीतील ही फूट आणि स्वतंत्र लढाई यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या स्वतंत्र उमेदवारांमुळे थेट सामना होईल. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ठिकाणी कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा उत्साह दिसत आहे.

एकूणच, या निवडणुका सत्ताधारी महायुतीसाठी कसोटीची ठरणार आहेत. विरोधी आघाडीला संधी मिळण्याची शक्यता असली तरी मतांचे विभाजन त्यांच्यासाठीही डोकेदुखी ठरू शकते. १५ जानेवारीच्या मतदानानंतर १६ जानेवारीला जाहीर होणारे निकालच अंतिम चित्र स्पष्ट करणार आहेत. दुसरं म्हणजे मनसे आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे) युती झाल्यामुळे त्यांना देखील फायदा होण्याची चर्चा आहे. आता राजकारणात नवीन वळण घडणारी ही निवडणूक आता सर्वांच्या लक्षाचा विषय ठरली आहे. युती तुटल्याने निर्माण झालेली अनिश्चितता आणि स्थानिक समीकरणे यांचा मेळ कसा बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अनेक ठिकाणी युती तुटल्यामुळे मतदरांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket