अध्यापन ही कला आहे .ज्ञान ,कौशल्य, क्षमता विद्यार्थी अंगी रुजवणेच काम शिक्षक करतात :- प्राचार्या डॉ वंदना नलवडे
सातारा:-अध्यापन ही कला आहे .ज्ञान ,कौशल्य, क्षमता विद्यार्थी अंगी रुजवणेच काम शिक्षक करतात.आपल्या अंगी असलेल्या कला सुप्त गुणांना चा विकास सांस्कृतिक कार्यक्रमातून करायचा आहे असं प्रतिपादन आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन सातारा चे प्राचार्या डॉ.वंदना नलवडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी एड द्वितीय वर्षातील छात्र अध्यापकांच्या सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन वेळी त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष गेंडाम, सतिश गायकवाड हे होते.यावेळी प्रा.सुधीर खरात, प्रा. डॉ. विनय धोंडगे,प्रा. डॉ. केशव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या डॉ वंदना नलवडे म्हणाल्या संस्कृती ,कला जपता आली पाहिजे.शिक्षकांच्या अंगीचौसष्ट कलांचा विकास झाला पाहिजे.यावेळी सतिश गायकवाड म्हणाले शब्दांच्या ज्ञानाबरोबरच कलेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.कलाकाराला रसिकांची मने जिंकून घेता आली पाहिजे.संतोष गेडाम म्हणाले मराठी भाषा ही सर्व गुणसंपन्न आहे.शिक्षकाला विश्वकोश च ज्ञान होणे गरजेचे आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर बी शिंदे यांनी केले सुत्रसंचलन प्रणिता गायकवाड व अतुल बोराटे यांनी व आभार दिपक पवार यांनी मानले.
