शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ, सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील( इंदलकर) यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम
एखाद्या विद्यार्थ्याच्या हुशारीचे मोजमाप त्याच्या गुणांवरून नव्हे तर त्याच्या अंगी असणाऱ्या कौशल्यावरून व्हावे’‐डॉ. पी एम जोशी
सातारा -करंजे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने’ शिक्षण प्रसारक संस्थे’ची स्थापना करणारे, तसेच सातारा नगरपालिकेमध्ये सतत 35 वर्षे नगरसेवक, त्याचप्रमाणे विविध समितींचे सभापती व शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून उत्तम कामगिरी पार पाडलेले कै.साहेबराव अनंतराव पाटील यांच्या एकविसाव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ ते बोलत होते.
करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था व कै साहेबराव पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पी. एम. जोशी यांचे ‘मुलांचे संस्कार ‘या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षक व पालक दोन्ही घटक महत्त्वाचे असतात असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच यशस्वीतेसाठी प्रयत्नच खूप महत्त्वाचे असतात हा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ.वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संचालिका सौ.हेमकांची यादव, मा. काका किर्दत तसेच कै साहेबराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सारंग पाटील ,उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदरणीय सर्व संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक ,ग्रामस्थ, पालक ,शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
