कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत बसप्पा पेठेतील अल्पवयीन मुलीची सुटका करणाऱ्या शूरवीरांचे सत्कार

शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत बसप्पा पेठेतील अल्पवयीन मुलीची सुटका करणाऱ्या शूरवीरांचे सत्कार

शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत बसप्पा पेठेतील अल्पवयीन मुलीची सुटका करणाऱ्या शूरवीरांचे सत्कार

सातारा: करंजेपेठ येथील शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत बसाप्पा पेठ येथे घडलेल्या घटनेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या “शूरवीरांचा सत्कार” या कार्यक्रमाचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी मा.सचिन म्हेत्रे साहेब (पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस स्टेशन) कॉन्स्टेबल सागर निकम व धीरज मोरे( सातारा शहर पोलीस स्टेशन), या घटनेतील विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेले अमोल इंगोले (माजी विद्यार्थी श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे पेठ उमेश अडागळे (माऊली ब्लड बँक) या सर्व मान्यवरांचे कौतुक आणि सत्कार शिक्षण प्रसारक संस्थेमार्फत करण्यात आले.

संबंधित मुलीला वाचवण्यासाठी उमेश अडागळे मोठ्या धाडसाने पुढे आले व अमोल इंगोले यांनी हल्लेखोर मुलाला प्रतिकार करत मुलीचा जीव वाचविताना त्याचा वार स्वतःच्या हातावर झेलला त्यात त्यांना दुखापत सुद्धा झाली.पोलीस कॉन्स्टेबल धीरज मोरे व सागर निकम यांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने हल्लेखोराला पकडले व मुलीचा जीव वाचवला.याबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सलाताई डुबल सचिव तुषार पाटील यांच्या हस्ते या धाडसी युवकांचा सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी बोलताना म्हेत्रे साहेबांनी विद्यार्थ्यांना “शालेय वयात चांगला अभ्यास करून करिअर घडवा समाजविघातक अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका असा मोलाचा संदेश दिला. तसेच अमोल इंगोले यांनीही विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर रहा व धाडसाने कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला.

 संस्था सचिव तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना “आई वडिलांची मान अभिमानाने उंचावेल असेच समाज विधायक कृत्य आयुष्यात करा” असा सल्ला देऊन बसाप्पा पेठेतील घटना दुर्दैवी असून अशा घटना होऊच नये म्हणून पालकांनी ,शिक्षकांनी, शाळांनी व समाजातील जबाबदार घटकांनी सतर्क राहून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणेसाठी सर्वंकष प्रयत्न केले पाहिजेत असा अनमोल संदेश दिला व आमच्या संस्थेमार्फत शाळेतील मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरु करण्याचे सूतोवाचही याप्रसंगी केले.

यावेळी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वत्सलाताई डुबल,उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम शिंदे,श्रीपतराव पाटील हायस्कूल चे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड, सातारा न्यूजच्या पौर्णिमा शिंदे व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket