Home » राज्य » प्रशासकीय » तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक अँन्ङ स्टेम लॅबचे मानकरी ,नामदार महेश शिंदे यांचे अनमोल सहकार्य

खटाव – विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक तंत्र कौशल्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले असून हे तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल राहणार असल्याचे मत डॉ.प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले. त्या ता. खटाव जि. सातारा येथील गौरीशंकरच्या सनशाईन इंग्लिश मिडियम स्कूल (सी.बी.एस.ई नवी दिल्ली) येथे नामदार महेश शिंदे यांच्या विशेष सहकार्यातून उभारलेल्या रोबोटिक अँन्ङ स्टेम लॅबच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

 यावेळी संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर ,प्राचार्या सौ. प्रमिला टकले, एजफेक्स टेक्नॉलाजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबादचे राजदिल जमादार ,मनोज यादव ,साहिल शिंदे अदि उपस्थित होते.

डॉ. प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या की नव्या पिढीला आधुनिक शिक्षणाची नितांत गरज आहे रोबोटिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता ( ऐ आय )ड्रोन टेक्नॉलॉजी सारखे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाचे ध्येय ठेवूनच नामदार महेश शिंदे यांनी या आधुनिक लॅब साठी विशेष प्रयत्न केले आहेत.

 गौरीशंकरचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप म्हणाले की स्पर्धात्मक स्पर्धेत नाविन्यपूर्ण शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण प्रणालीतील बदलती आव्हाने स्वीकारून त्यावर मात करणारा सक्षम मनुष्यबळ निर्मिती आजची खरी गरज आहे. नामदार महेश शिंदे यांनी दूरदृष्टीने या ठिकाणी उभारलेल्या रोबोटिक अँड स्टेम लॅबचा लाभ येथील विद्यार्थ्यांना निश्चित होईल.

संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणा बाबत अधिक सजग झाला आहे. काळानुसार बदलणारे शिक्षणाची संधी त्यांना मिळाली पाहिजे जगाशी स्पर्धा करणारे मनुष्यबळ निर्मिती हे भारतीय नव्या शैक्षणिक प्रणालीचे धोरण आहे . विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आता रोबोटिक तंत्रज्ञान ,ङ्रोन टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता सह इतर तंत्रज्ञानाचे ओळख करून दिली पाहिजे.

यावेळी रोबोटिक अँन्ङ स्टेम लॅब चे महत्व व कार्यप्रणाली याची उपयुक्तता याविषयीची विशेष माहिती यावेळी एजफेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबादचे हेड राजदिल जमादार, महाराष्ट्र प्रमुख महेश यादव यांनी विद्यार्थ्यांना व पालक वर्गांना दिली.

प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक वैभव जठार यांनी केले सूत्रसंचालन रघुनाथ घाडगे यांनी केले व आभार प्राचार्या प्रमिला टकले यांनी मानले.

 आधुनिक शिक्षण प्रणालीची कास धरून वाटचाल करणाऱ्या सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल खटावने ज्ञान संपन्नतेत मोलाची भर घातली आहे. इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या या स्कूलने अल्पवधीत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.  खटावच्या सर्वांगीण प्रगतीचे ध्येय ठेवून वाटचाल करणारे नामदार महेश शिंदे यांनी गौरीशंकरच्या सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना रोबोटिकचे नाविन्यपूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने खटावच्या भूमीत प्रथमच रोबोटिक अँड स्टेम लॅब उभारणी केली आहे .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाने अधिक सक्षम घडविणे हा या पाठीमागील मुख्य उद्देश नामदार महेश शिंदे यांचा आहे यासाठीचा सर्व तो निधीची पूर्तता नामदार महेश शिंदे यांनी केले असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे कवाडे आता खुले झाले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 35 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket