कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

तालुकास्तरावर मोफत पाठ्यपुस्तके वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके                     

कराड प्रतिनिधी – सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिल्या जाणारी मोफत पाठ्यपुस्तक तालुकास्तरावरती उपलब्ध झालेले आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व नगरपालिका प्राथमिक शाळा,सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक व प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्याना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. चालू 2025/2026 शैक्षणिक वर्षातील मोफत पाठ्यपुस्तकाचे ४३२५१ संच उपलब्ध झाले आहेत.जिल्हा स्तरावरुन तालुकास्तरावर प्राप्त झाले त्याचे केंद्र स्तरावर वितरण करण्यात आले असले ची माहिती गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी दिली.

जिल्हापरिषद , नगरपालिका व सर्व अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील सर्व मुला मुलींना ही मोफत पाठ्यपुस्तकाचे शाळेच्या पहिल्या दिवशी वितरण केलं जातं. चालु शैक्षणिक वर्षासाठी एकुण ४३२५१ पुस्तकाचे संच उपलब्ध झाले आहेत. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी 4928 संंच,इयत्ता दुसरीसाठी 4928 संच,इयत्ता तिसरी साठी 4928संच, इयत्ता चौथीसाठी 5402 संच,इयत्ता पाचवीसाठी 5630 संच,इयत्ता सहावीसाठी 5459संच, इयत्ता सातवी साठी 5771 संच,इयत्ता आठवीसाठी 6205 संच असे एकूण 43251 पुस्तकाच संच तालुकास्तरावरती प्राप्त झाले आहेत.याचे तालुकास्तरावर केंद्रस्तरावरती याचं वाटप करण्यात आले आहे.कराड तालुक्यातील 24 केंद्रांमध्ये सध्या या पुस्तकाचं वाटप सुरू आहे आणि केंद्रस्तरावरून शाळा सुरू होण्यापूर्वी या पाठ्यपुस्तकाचे शाळा स्तरावर वाटप होणार आहे.इयता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी या मोफत पाठ्यपुस्तके वितरण शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्ययांच्या उपस्थित करावयाचे आहे.तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप,जमिला मुलाणी, निवास पवार,शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट याचबरोबर सर्व केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.   

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व सर्व‌‌‌अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्याना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.यावर्षी ही शाळेच्या पहिल्या दिवशी ही मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत.

    बिपिन मोरे 

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कराड.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket