Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » मुलांचे आणि पालकांचे प्रबोधन करणारे ‘-निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श ‘

मुलांचे आणि पालकांचे प्रबोधन करणारे ‘-निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श ‘

मुलांचे आणि पालकांचे प्रबोधन करणारे ‘-निसर्गाचे गोड गुपित यौवनस्पर्श ‘

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा तर्फे जागतिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर मोहन सुखटणकर यांच्या ‘ निसर्गाचे गोड गुपित .. यौवनस्पर्श ‘(मुलांसाठी आणि मुलींसाठी )या पुस्तकावर परिचर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी डॉक्टर अनिमिष चव्हाण ,डॉक्टर राजेंद्र माने ,डॉक्टर संदीप श्रोत्री ,डॉक्टर मेधा क्षीरसागर या वक्त्यांनी आपली मते मांडली.सर्वप्रथम डॉक्टर मोहन सुखटणकर यांनी या पुस्तक लिहिण्यापाठीमागचा आपला उद्देश स्पष्ट करताना आपल्याला आलेल्या पेशंटचे अनुभव सांगितले व त्यातून मुलांना प्रबोधन करणारे असं काहीतरी लिखाण करायला हवे वाटून या पुस्तकाचे लेखन केले असे प्रतिपादन केले.

डॉक्टर अनिमिष चव्हाण यांनी मुलांची आणि मुलींची मनोवस्था ध्यानात घेऊन अनेक बारकावे डॉक्टर सुखटणकर यांनी या पुस्तकात मांडले आहेत असे सांगून फक्त मुलांना ही माहिती उपयुक्त नसून पालकांनाही याबाबतीत मार्गदर्शन मिळू शकेल .वाढत्या वयात मुलांच्या मनात अनेक समज गैरसमज असू शकतात. त्यांना निर्माण होणारे प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून सुटतील .मुलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्या अनेक समस्यावर उत्तरे दिली गेली आहेत .अशी पुस्तके मुलांना, पालकांना वाचायला दिली पाहिजेत .अभ्यासक्रमात सेक्स एज्युकेशन पाहिजे .म्हणजे उत्सुकतेपोटी मुले इतर कुठून तरी चुकीचे ज्ञान घेणार नाहीत .लैंगिक शिक्षण हे अद्ययावत, सर्वसमावेशक आणि सामाजिक-सांस्कृतिक भान राखणारे असायला हवे.

 लैंगिक शिक्षणात समाजाने हिरीरीने सहभागी व्हायला हवे. लैंगिक शिक्षण, सामाजिक सहभाग, मानसिक आरोग्य, सांस्कृतिक पर्यावरण यांचा मुलांच्या लैंगिक वर्तनावर परिणाम होतो. असे मत डॉ चव्हाण यांनी व्यक्त केले .

डॉक्टर राजेंद्र माने यांनी या पुस्तकात अतिशय साध्या सोप्या भाषेद्वारे वाढत्या वयातल्या मुलांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे .गुगल वर वाचून अल्पज्ञान प्राप्त करण्यापेक्षा अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना त्यांच्या शरीराची जाणीव करून देणे हे महत्त्वाचे आहे .यातली चित्रे मुलांना स्वतःच्या शरीरासंबंधी जाणून घ्यायला मदत करणारी आहेत.मुलांच्या मनावरची लैंगिक प्रश्नांची अभ्रे हे पुस्तक दूर करेल असे मत व्यक्त करतानाच डॉ सुखटणकर यांचे अभिनंदन केले.

डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी अशा पुस्तकांचे वेगवेगळ्या भाषेत अनुवाद व्हायला पाहिजेत .या पुस्तकाचा परिचय सर्व दूर व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले

डॉक्टर मेधा क्षीरसागर यांनी या पुस्तकांमध्ये पॉर्नोग्राफी पासून ते पोक्सो कायद्यापर्यंत सर्व विषयाची माहिती डॉक्टरांनी दिली आहे . मुलांनी हे पुस्तक वाचले तर त्यांना वेगळे काही सांगायची पालकांना व शिक्षकांना भासणार नाही असे मत व्यक्त केले .

याच कार्यक्रमांमध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त सातारा शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञांचा सत्कार नगरवाचनालयातर्फे वाचनालयाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी डॉक्टर सुरेश काजरेकर ,डॉक्टर मोहन तांबे,डॉक्टर विद्या कुलकर्णी,डॉक्टर विजय सुखटणकर,डॉक्टर प्रकाश जोशी,डॉक्टर सुभाष दर्भे यांचा वैद्यकीय सेवेबद्दल सत्कार करण्यात आला .डॉक्टर सुभाष दर्भे ,डॉक्टर विद्या कुलकर्णी , डॉ मोहन तांबे यांनी नगर वाचनालयाने सर्वांच्या केलेल्या सत्काराबद्दल ऋण व्यक्त केले .

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर श्याम बडवे यांनी केले तर आभार प्रदीप कांबळे यांनी मानले .कार्यक्रमाला विजयराव पंडीत ,मुकुंद फडके ,गौतम भोसले, आनंद ननावरे ,डॉक्टर चंद्रकांत शेटे,प्रा.श्रीधर साळुंखे ,सुखटणकर कुटुंबीय,श्री किशोर बेडकीहाळ,डॉ.वैशाली चव्हाण उपस्थित होते .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket