स्वीडिश कंपन्यांची महाराष्ट्राला प्रथम पसंती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे स्वीडिश कंपन्यांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच स्वीडिश शिष्टमंडळासमवेत चर्चा केली.या प्रसंगी कँडेला आणि महाराष्ट्र शासनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला ज्या अंतर्गत ₹1990 कोटींची गुंतवणूक होणार असून 6000 रोजगार संधी निर्माण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडिश कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आवश्यक धोरणात्मक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे उद्योगांसाठी सर्वोत्तम ठिकाण असून, स्वीडिश कंपन्यांनी येथे नव्या संधी शोधाव्यात. बिझनेस स्वीडनच्या मुंबईतील नवीन कार्यालयामुळे भारत-स्वीडन व्यापार संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच जलटॅक्सी सेवा आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी स्वीडिश कंपन्यांचे सहकार्य अपेक्षित असून, राज्य सरकार त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी उपस्थित विविध कंपन्यांचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी
✅जान लार्सन – स्वीडन सरकार/बिझनेस स्वीडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी
✅जोआकिम गुन्नार्सन – डेप्युटी कॉन्सुल जनरल
✅कमल बाली – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, व्हॉल्वो
✅मॅट्स पाम्बर्ग – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, साब इंडिया
✅किरणकुमार आचार्य – व्यवस्थापकीय संचालक व मुख्य आर्थिक अधिकारी, सँडविक
✅कॅथरिना कोल्किंग – जनरल मॅनेजर, एपिरॉक
✅उमेश शाह – व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष, ऑटोलिव
✅सुरभी शर्मा, क्लस्टर व्हाईस प्रेसिडेंट व सीएमओ, अल्फालावल
✅हेमंत मेका राव – ग्रुप मुख्य कार्यकारी अधिकारी, MEKA ग्रुप
✅अभिषेक कुमार – संस्थापक व जीपी, 1950 व्हेंचर्स
✅आदित्य पारख – ग्लोबल सीओओ, अशोका बिल्डकॉन
✅फिलिप्पा गेरहार्डसन – आजना होल्डिंग AB
✅राज अय्यर – कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर, एनव्हॅक
✅ध्रुवांक वैद्य, विनीता दीक्षित – स्पॉटिफाय
✅नकुल विराट – मुख्य कार्यकारी अधिकारी, कँडेला
✅सेसिलिया ओल्डने – चीफ इंडिया रिप्रेझेंटेटिव्ह, स्वीडन-इंडिया बिझनेस कौन्सिल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्वीडिश कंपन्या महाराष्ट्रात आधीपासून कार्यरत आहेत, मात्र नवीन कंपन्यांचे स्वागत असून, धोरणात्मक सुधारणा करण्यासही राज्य सरकार तत्पर असल्याचे अधोरेखित केले. जलवाहतूक आणि जलटॅक्सी प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी स्वीडिश कंपन्यांच्या सहकार्याने अधिक संधी निर्माण केल्या जातील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीडन दौऱ्यात इंडिया-स्वीडन बिझनेस लीडर्स राउंडटेबल ही धोरणात्मक परिषद स्थापन करण्यात आली होती. स्मार्ट सिटी आणि पायाभूत सुविधांवर येथे चर्चा होते. बिझनेस स्वीडन ही स्वीडन सरकारची संस्था असून, ती स्वीडिश कंपन्यांना आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना स्वीडनमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करते. भारतातील सुमारे 280 स्वीडिश कंपन्यांपैकी बहुतांश महाराष्ट्रात कार्यरत असून, महाराष्ट्र आणि स्वीडनमधील व्यापार व गुंतवणूक अधिक बळकट होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यावेळी स्वीडिश प्रतिनिधींनी जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आता भारताच्या वाढलेल्या सन्मानाला देखील अधोरेखित केले. महाराष्टात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि कार्यप्रणालीची ही त्यांनी स्तुती केली.
