स्वरा साबळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात गुणवत्ता यादीत
शिवथर.(सुनिल साबळे) शिवथर तालुका सातारा येथील किसनराव साबळे पाटील विद्यालय शिवथर -आरफळ येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या विद्यालयाची स्वरा महेश साबळे ही सातारा जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती धारक बनण्याचा बहुमान मिळवला.
स्वरा महेश साबळे शिष्यवृत्ती परीक्षेत तीनशे पैकी 2४६ गुण मिळवून सातारा जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीधारक बनण्याचा बहुमान मिळवला तसेच अथर्व निलेश साबळे यांनी 300 पैकी 166 गुण मिळवले अर्णव राहुल साबळे याने 300 पैकी 154 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत बहुमान मिळवला.
शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एसबी मोरे विशेष मार्गदर्शन वसावे एस एस घाडगे एस पी नलावडे पीजी मुख्याध्यापक सीजी चौधरी संभाजी पाटील आर आर मोरे विद्या शेडगे एसएम शिंदे ए एस कुराडे जे एस साबळे आशिष साबळे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक किरण साबळे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष युवराज पवार शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिवथर गावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य आरफळ गावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामस्थ पालक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
