Home » देश » सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर उतरल्या

सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर उतरल्या

सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर उतरल्या

तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवर परत आले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. याबरोबरच मुळात आठ दिवसांसाठी नियोजित असणारी ही मोहिम नऊ महिन्यानंतर संपुष्टात आली आहे. दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले. फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले. जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या.

नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरूवातीला अवघ्या एक आठवड्याच्या कालावधीसाठी अंतराळात गेले होते. पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा मुक्काम वाढला होता. त्यानंतर आता स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी त्यांच्या परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १०व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली होती. ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विल्यम्स आणि विल्मोर यांनी ऐकूण २८६ दिवस अंतराळात घालवले आहेत. म्हणजेच एकूण नियोजित दिवसांपेक्षा २७८ दिवस जास्त काळ त्यांना अंतराळात राहावे लागले. या लांबलेल्या मोहिमेदरम्यान त्यांनी ४,५७६ वेळी पृथ्वीला फेरी मारली आणि पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याआधी जवळपास १९५ दशलक्ष किलोमीटर प्रवास केला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket