राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य दशरथ सगरे यांना पीएच.डी. पदवी सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन
Home » राज्य » सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत.

सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत.

“मी सुनेत्रा अजित पवार.. महाराष्ट्राला लाभल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याबरोबरच सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पूर्ण झाला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीवेळी दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले.

सुनेत्रा पवार यांचा जन्म (१८ ऑक्टोबर १९६३) मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आहे. धाराशिवचे नेते, माजी मंत्री आणि शरद पवारांचे जुने स्नेही पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता. १९८० मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचा सहभाग मात्र होता.

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली. लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम

राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून

Live Cricket