Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सुकन्या शिवाजी यादव हिची महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व इतर राज्य सामायिक परिक्षेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभिनंदनीय निवड.

सुकन्या शिवाजी यादव हिची महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व इतर राज्य सामायिक परिक्षेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभिनंदनीय निवड.

सुकन्या शिवाजी यादव हिची महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व इतर राज्य सामायिक परिक्षेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभिनंदनीय निवड.

भुईंज :- (पत्रकार महेंद्रआबा जाधवराव) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षण घेत असलेली कु. सुकन्या शिवाजीराव यादव हिची महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व इतर राज्य सामायिक परिक्षेमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली.

अजिंक्यतारा सह. साखर कारखाना लि.शाहूनगर शेंद्रे येथील शेती विभागातील ऍग्री सुपरवायझर श्री. शिवाजीराव यादव आणि सासपडे ग्रामपंचायत सदस्या सौ. रंजना यादव यांची कन्या कु. सुकन्या हिच्या या यशस्वी निवडीबद्दल तिचे आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतीकाराजे भोसले, कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते, मुख्य शेती अधिकारी श्री. विलास पाटील, डेप्युटी शेती अधिकारी श्री. लालसिंग शिंदे तसेच शेती विभागतील अधिकारी – कर्मचारी आणि सासपडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

पदव्युत्तर पदवी (एमएस्सी)

कृषी शाखे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. यासाठी विद्यार्थ्यांना आयसीएआर/एमसीएईआर (ICAR/MCAER) मार्फत घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर गुणानुक्रमे निवड होऊन पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विविध शाखेत अभ्यासक्रमाकरिता प्रवेश दिला जातो.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची ५५ टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा १५ ते १६ टक्के वाटा आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात होणे ही काळाची गरज आहे. अनेक उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल हा शेती मधूनच पिकवला जातो. देशाची अर्थव्यवस्था आणि विकासदर हा शेतीच्या उत्पादकतेवर अवलंबून आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी युवक – युवतींचा कृषिविषयक शिक्षण आत्मसात करण्याकडे अधिक कल आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Post Views: 64 महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त

Live Cricket