गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
महाबळेश्वर:दि.सातारा कॅम्प लायन्स नॅब चारिटेबल नेत्र रुग्णालय, न्यू राधिका रोड, सातारा यांच्या सहकार्याने गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत ३४५ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या दृष्टी समस्यांवर उपाय मिळणार आहे.
सदर उपक्रमासाठी मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी प्रशालेस शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमासाठी सातारा कॅम्प लायन्स नॅब चारिटेबल नेत्र रुग्णालयाचे श्री. चव्हाण, कु. मोरे मॅडम व कु. निकम मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. बगाडे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे,” असे प्रशालेचे प्राचार्य श्री. पी. आर. माने सर यांनी सांगितले.
यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही अनमोल सहकार्य लाभले. प्रशालेने भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रेरणादायी ठरला आहे.