राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना अँप्रन बंधनकारक.. राज्य सरकारचे महाविद्यालयांना स्पष्ट निर्देश, निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत ..
वैद्यकीय सेवा क्षेत्र अधिक गतिमान करण्या बरोबर सक्षम व पारदर्शक कारभार येण्यासाठी नव्याने बदल होत आहेत त्यामध्ये रुग्ण डॉक्टर व नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद व समन्वय साधण्यासाठी आता राज्य सरकारचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई यांनी एक पाऊल पुढे टाकत राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना कर्तव्यावर कार्यरत असताना अँप्रन परिधान करणे बंधनकारक केले आहे याविषयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांचा विशेष लेख…
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणारे अधिष्ठाता, प्राध्यापक, पदवी पूर्व, पदव्युत्तर ,आंतर निवासी, विद्यार्थी निवासी डॉक्टरांना महाविद्यालय परिसरात कर्तव्यावर असताना अँप्रन परिधान करणे राज्यसरकारने बंधनकारक केले आहे त्या संदर्भातील स्पष्ट निर्देश राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत या निर्णयाची राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी तातडीने अंमलबजावणी करून तसा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सादर करावा असे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दिली आहेत या निर्णयामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यप्रणाली मध्ये सुसूत्रता येण्याबरोबरच अध्यापन करणारे डॉक्टर व ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक स्पष्ट होणार आहे बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर कोण आणि विद्यार्थी कोण यामधील फरक रुग्णांना अथवा नातेवाईकांच्या लक्षात येत नाही परिणामी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ही गोंधळ उडतो याबाबत राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधीन राहून राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना पांढऱ्या रंगाचे अँप्रन परिधान करणे बंधनकारक केले आहे या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.
चौकट – राज्यात आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांची एकूण 42 वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत आहेत यामध्ये ज्ञानदानाचे कार्य करणारे डॉक्टरांची संख्या 2 हाजार 564 आहे तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 7हाजार 778 इतकी आहे या क्षेत्रात सर्व स्तरातून सुसूत्रता यावी व कार्यप्रणाली गतिमान व्हावी या दृष्टीने घेतलेला निर्णय स्तुतयआहे.
– राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यव्यावर असताना वैद्यकिय शास्त्राच्या नियमानुसार त्यांनी अँप्रन परिधान करणे बंधनकारक असताना या नियमाचे पालन डॉक्टरांकडून केले जात नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले नियमाचे पालन संबंधितानी करावे व वैद्यकीय महाविद्यालयात शिस्तीचे पालन व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब सातारा
