Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » राज्यात १३,५६० पदांसाठी पोलिस भरती; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा

राज्यात १३,५६० पदांसाठी पोलिस भरती; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा

राज्यात १३,५६० पदांसाठी पोलिस भरती; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा

तरुणांना सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी मिळणार आहे. राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त आहेत. या पदांसाठी आता भरती जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे. राज्यात तब्बल दहा हजार १८४ पोलिसांची पदे रिक्त आहे.यामध्ये बँडसमन, राज्य राखीव पोलिस बल अशी दीड हजार पदे रिक्त आहेत. यानंतर प्रशिक्षण व खास पथकांसाठी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिली आहे.पोलीस दलातील तब्बल 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली आणि या भरतीला शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारने तातडीने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती अत्यंत आवश्यक होती. सरकारच्या या निर्णयाचे युवा वर्गातून  स्वागत केले जात आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket