Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एस. टी.च्या भाडेवाढ विरोधात शिवसेना शहराच्या वतीने चक्का जाम

एस. टी.च्या भाडेवाढ विरोधात शिवसेना शहराच्या वतीने चक्का जाम

एस. टी.च्या भाडेवाढ विरोधात शिवसेना शहराच्या वतीने चक्का जाम

महाबळेश्वर -शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि संपर्क नेते आमदार भास्कर जाधव, नितिन बानूगडे पाटील उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख,दगडूदादा सपकाळ पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बस भाडेवाढ विरोधात महाबळेश्वर येथील मुख्य बसस्थानक येथे दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने महाबळेश्वर एसटी बस स्थानकात रास्ता रोको करत निषेध करुन निवेदन देण्यात आले.

  एसटी महामंडळाने नुकताच एसटीच्या भाड्यात १५% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एस, टी.ही सामान्य माणसांची जीवन वाहिनी आहे.प्रचंड महागाईने सामान्य आधीच होरपळला असताना ही भाडेवाढ अन्याय कारक आहे.

या मुळे केलेली भाङेवाढ रद्द करण्यात यावी तसेच महाबळेश्वर हे जागतीक पर्यटन स्थळ असल्याने जग भरातुन पर्यटक येथे भेटी देत असतात परंतु एस टी बसेसच्या झालेल्या दूरावस्थे मुळे पर्यटकांना होणारा त्राय यातुन मुक्तता करुन त्यांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एसटी बसेस मध्ये सुधारणा करुन कोलमङलेले वेळापत्रक याची योग्य दखल घेउन एसटी सेवा सुरळीत करावी अशी मागणी ही आगार व्यवस्थापकांकङे करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)सातारा उपजिल्हाप्रमुख श्री.अजित यादव,तालुका प्रमुख श्री. संतोष(आप्पा) जाधव,शहरप्रमुख श्री.राजाभाऊ गुजर,महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री भिसे, सातारा जिल्हा प्रसिद्धी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पांचाळ,आरोग्य सेना शहरप्रमुख अमोल साळुंखे,महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.सुजाता मोरे, उपतालुकाप्रमुख सौ.पौर्णिमा मोहिते,शहरप्रमुख सौ.वसुधा बगाडे,प्रशांत मोरे,उपशहरप्रमुख राजू साळवी, जितेश कुंभारदरे असिफ महापुळे, अल्ली वारूणकर, अतुल पारवे, दीपक ताथवडेकर ,समीर तांबोळी, आबा पारठे,शाहनवाज खारकंडे, अंकुश ऊलालकर,वैभव शिंदे,ऋषिकेश यादव,अशोक शिंदे,एकनाथ मोरे पत्रकार राजेश सोंडकर,संजय चोरघे,प्रशांत भोसले आदी सह शिवसैनिक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Post Views: 82  ठाकरे बंधू  एकत्र येणार   राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत

Live Cricket