श्री.भैरवनाथ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
केळघर प्रतिनिधी|गणेशोत्सव समाजासाठी या उपक्रमाअंतर्गतयेथील श्री.भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव कालावधीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. मंडळाच्या वतीने आज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी चे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव, मंडळाचे अध्यक्ष नितेश शिर्के यांच्यासह यावेळी राजेंद्र धनावडे ,शंकर जांभळे , सचिन पार्टे ,सुनील जांभळे,बंडा बेलोशे , सुनिल जांभळे, जगन्नाथ पार्टे , बाजीराव धनावडे, संजय पार्टे , दीपक मोरे सागर पार्टे, सतिश पार्टे, संतोष पार्टे, नवनाथ बेलोशे, प्रमोद मोरे, प्रमोद शिर्के ,संदीप बेलोशे, योगेश शिर्के अजय जांभळे प्रीतम पार्टे, योगेश गाडवे, नीतेश बेलोशे,अभिषेक जांभळे व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.४७रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.मंडळाच्या या सामाजिक बांधीलकीचे मान्यवरांनी कौतुक केले.
