Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » सोमवारी मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्था व माय बीट्स स्टुडिओतर्फे आयोजन

सोमवारी मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्था व माय बीट्स स्टुडिओतर्फे आयोजन

सोमवारी मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्था व माय बीट्स स्टुडिओतर्फे आयोजन

सातारा-येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांच्यातर्फे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम सपनोंका सौदागर या संकल्पनेअंतर्गत सादर केला जाणार आहे. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे .यावेळी गायक कलाकार डॉक्टर लियाकत शेख, अल्ताफ मुल्ला, डॉक्टर वाय पी चव्हाण, जलील शेख, गणेश शिंदे, वनिता कुंभार मंजिरी दीक्षित, सीमा राजपूत, चित्रा भिसे विविध गाणी सादर करणार आहेत 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद पांडे,विजय जंगम, विश्वास पवार, मकरंद भेडसगावकर, मुकुंद फडके, सुनील साबळे, शिरीष चिटणीस व डॉक्टर लियाकत शेख उपस्थित राहणार आहेत. यावेळी सातारची शिखर कन्या धैर्या विनोद कुलकर्णी हिचा माय बिट्स स्टुडिओ तर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे 

या कार्यक्रमाचे संयोजन व संकल्पना डॉक्टर लियाकत शेख यांची असून ध्वनी व्यवस्था अक्षता व सचिन शेवडे पाहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन चित्रा भिसे करणार आहेत .सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरीष चिटणीस व डॉक्टर लियाकत शेख यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त

Post Views: 29 स्वर श्रद्धांजली आदर्श उपक्रम:शिरिष चिटणीस गायनसेवेच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त सातारा| दिवंगत व्यक्तींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी स्वर श्रद्धांजलीच्या

Live Cricket