श्रीमती मीनलबेन महेता महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला
पांचगणी (प्रविण घाडगे )-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या, श्रीमती मीनलबेन महेता महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व NSS यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना प्रा. ऋषिकेश इनामदार सर यांनी संविधान दिन का साजरा करावा व त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई सर यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय संविधानाचे विवेचन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी संविधानातील प्रतिज्ञाचे वाचन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश मदने सर व आभार प्रदर्शन प्रा.सागर पारधी सर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग,विद्यार्थी व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.




