Home » राज्य » शेत शिवार » स्मार्ट मीटरला ग्रामीण जनतेतून तीव्र विरोध : संतोष जाधव यांची भूमिका

स्मार्ट मीटरला ग्रामीण जनतेतून तीव्र विरोध : संतोष जाधव यांची भूमिका

स्मार्ट मीटरला ग्रामीण जनतेतून तीव्र विरोध : संतोष जाधव यांची भूमिका

महाबळेश्वर दि. २३ : ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या वीज पुरवठ्यावरील स्मार्ट मीटर बसविण्याच्या निर्णयाला स्थानिक जनतेकडून जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी शासनाच्या या धोरणावर तीव्र शब्दात टीका करत जनतेची भूमिका स्पष्ट केली आहे.

संतोष जाधव म्हणाले की, ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि सामान्य जनता आधीच वीज दरवाढ, अनियमित पुरवठा आणि वारंवार होणाऱ्या खंडित सेवेमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय हा लोकांवर अन्याय करणारा आहे. स्मार्ट मीटरमुळे जनतेच्या खिशाला मोठा फटका बसेल तसेच यंत्रणेतील तांत्रिक अडचणींचा बोजा थेट ग्राहकावर पडणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या पंपाला वीज पुरवठा आधीच अपुरा आहे. रात्री उशिरा दिली जाणारी वीज आणि कमी दाबाचा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात येतात. अशा वेळी स्मार्ट मीटर लावून वीज वापराचे स्वयंचलित नियंत्रण करणे म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणणे आहे.

स्मार्ट मीटर बसविण्याबाबत कोणतीही जनजागृती न करता थेट बसविण्याची कारवाई सुरू असल्याबद्दलही त्यांनी निषेध व्यक्त केला. “ग्रामीण जनतेच्या संमतीशिवाय लादले जाणारे धोरण आम्ही कदापि मान्य करणार नाही. जर शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशाराही जाधव यांनी दिला.

दरम्यान, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोखून धरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 220 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket