श्रीपतराव पाटील हायस्कूलचा बॉक्सर बनला नॅशनल चॅम्पियन
सातारा-करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूलचा विद्यार्थी यश भगवान निकम याने नोएडा उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या सब ज्युनिअर मुले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाचव्या आणि फायनल सामन्यामध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले व तो नॅशनल चॅम्पियन बनला.
तसेच जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातवी मधील दिव्यांशू दिग्विजय डुबल याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.तर सिद्धार्थ महेश खामकर इयत्ता सातवीतील विद्यार्थी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदकाचा मानकरी ठरला.
या तीनही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.त्यांच्या या यशामध्ये त्यांचे प्रशिक्षक श्री सागर जगताप यांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे.
बॉक्सिंग मध्ये गरुड झेप घेणाऱ्या या तीनही खेळाडूंचा सह पालक सत्कार संस्था सचिव तुषार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक यशवंत गायकवाड, खेळाडूंचे पालक तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
