शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी मकर संक्रांती साजरी न करण्याचा निर्णय
प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एक भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाल्यामुळे हौतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मकर संक्रांतीचा सण साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. दरवर्षी प्रमाणे मकर संक्रांती निमित्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे लक्ष्मी विलास पॅलेसवर मकर संक्रांतीचा सण साजरा करीत असतात, परंतु नुकत्याच सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला जिल्ह्यातील एक भारतीय जवान शहीद झाल्यामुळे वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून तिळगुळाचा कार्यक्रम रद्द केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
श्रीमंत रामराजे यांनी शहीद जवानांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या अशा अत्यंत चार दुर्दैवी घटना : अवघ्या ३ दिवसात ४ भारतीय सैनिक हौतात्म्यास प्राप्त झाले.काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना १२ मराठा इन्फंट्रीचे वैभव श्रीकृष्ण लहाने, मु.कपिलेश्वर जि.अकोला,दक्षिण आफ्रिका शांतता मोहीमेवर कर्तव्य बजावत असताना जवान नायक विलास विठ्ठल गावडे, मु.बरड ता.फलटण, जि.सातारा, जवान अभिजीत माने मु.भोसे, ता.कोरेगांव, जि.सातारा, अवघ्या आठ तासाच्या छोट्याशा बाळाला न पाहताच, जवान प्रमोद परशुराम जाधव मु.दरे, जि. सातारा यांनी घेतला जगाचा निरोप.




