Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती Yonex – Sunrise 1st महाराष्ट्र सीनियर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धा उद्घाटन सोहळ्याला छत्रपती राजघराण्याची एकत्रित उपस्थिती

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती Yonex – Sunrise 1st महाराष्ट्र सीनियर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धा उद्घाटन सोहळ्याला छत्रपती राजघराण्याची एकत्रित उपस्थिती

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती Yonex – Sunrise 1st महाराष्ट्र सीनियर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धा उद्घाटन सोहळ्याला छत्रपती राजघराण्याची एकत्रित उपस्थिती

सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ एक आगळं वेगळं आणि राज्य पातळीवरचं महत्त्वाचं क्रीडा आयोजन सातारा नगरीत साकारलं गेलं आहे.

सातारा-“श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले स्मृती Yonex – Sunrise 1st महाराष्ट्र सीनियर राज्य निवड बॅडमिंटन स्पर्धा 2025”याचे आयोजन दिनांक २४ जुलै ते २९ जुलै दरम्यान करण्यात आले असून,या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती राजघराण्याची एकत्रित उपस्थिती लाभली. हा कार्यक्रम सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या विशेष प्रसंगी उपस्थित मान्यवर श्रीमंत सौ. कुवराणी सत्वशीलाराजे सिंग (अक्का महाराज), श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले (राणीसाहेब), श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे भोसले, सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले, जिल्हा क्रिडा अधिकारी श्री नितीन तारळकर, श्री.चंद्रहास कान्हेरे, श्री. सुधाकर शानभाग, श्री.सुरेश साधले, श्री.पंकज चव्हाण, श्री.नयनराजे भोसले, श्री.राज माजगावकर, श्री.निलेश फणसळकर , श्री.घनशाम शहा, श्री.सचिन देशमुख, श्री.ओंकार पालकर, श्री.जीवन जगताप उपस्थित होते.

छत्रपती घराण्याच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास राजेशाही गौरव लाभला आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेंच्या स्मृतीस पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली.श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांचं मनोबल वाढवलं. त्यांनी सांगितलं की – “खेळ हे केवळ शरीराची नव्हे, तर मनोबल आणि चारित्र्याची घडण घडवतं. महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना अशा राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धांमधून उभं राहण्याची संधी मिळणं ही काळाची गरज आहे.”

       शिवकालीन मूल्यांचा वारसा लाभलेल्या सातारा नगरीत, महाराष्ट्रातील सर्वोत्तम खेळाडूंचा निवडप्रक्रियेचा हा सोहळा म्हणजे प्रेरणेचा महोत्सव ठरतो आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 11 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket