श्री म्हाळसाकांत पतसंस्थेचे चेअरमन धनंजय पाटील यांना आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित
सातारा प्रतिनिधी-2025 चा विश्वनाथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार पाल (तालुका कराड) येथील श्री म्हाळसाकांत पतसंस्थेचे चेअरमन धनंजय पाटील यांना आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.हा पुरस्कार सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 सत्कारमूर्तींचा ही महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.या पुरस्काराचे आयोजन पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन येथे पार पडला. विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर आणि इन्फौंडेड टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन अँड. शंकर चव्हाण यांनी केले. तर उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रमुख पाहुणे सिने दिग्दर्शक ओंकार माने, सामाजिक कार्यकर्ता स्मिता चावडा, कांचन आहेर, सुजाता चिंता उपस्थित होत्या. सूत्रसंचालन यशस्विनी पाटील व स्वागत गीत सृष्टी चव्हाण यांनी सादर केले.
प्रमुख पाहुणे व उद्घाटक यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करून महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला.प्रमुख पाहुणे ओंकार माने यांनी आपल्या भाषणात या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व गौरव व्यक्तींचे गुणगान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिने अभिनेत्री गायकवाड म्हणाल्या, फाउंडेशनने जे कार्य चालू केले आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि या समाजातील समाजसेवेसाठी जे कार्य करत असलेल्या व्यक्ती त्यांचे गुणगान आणि कौतुकाची थाप पडणे आवश्यकच आहे. यामध्ये धनंजय पाटील यांचे आरोग्य सेवेतील हे काम पाहून त्यांचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, आरोग्य क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्रभर प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य व आरोग्याचे ज्ञान देण्याचे कार्य तसेच याव्यतिरिक्त आपल्या हातून होत असलेली राष्ट्रसेवा ही खरोखरच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे, कष्टाची जाणीव व सध्याची कास धरून चालताना, 21व्या शतकात आरोग्य ही सर्वात मोठी समस्या आहे हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून तरुणांना सोबत घेऊन त्रास मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना उराशी बाळगून त्यांचे कार्य चालू आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असावं याचे उत्तम उदाहरण त्यांच्याकडे पाहिलं की लक्षात येतं.. म्हणून सन्मान आणि उल्लेखनीय कार्याचा गुणगौरव झालाच पाहिजे, असेही गायकवाड शेवटी म्हणाल्या.
सत्कारमूर्ती धनंजय पाटील यांनी आयोजकांचे आभार मानून म्हणाले, आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही आरोग्याची बनत चाललेली आहे, ही समस्या दूर करण्यासाठी “निरोगी भारत सक्षम भारत” अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचे काम हॅप्पी मेडिकेअर करत आहे, येणाऱ्या व्यक्तींना आरोग्याचे ज्ञान आणि निरोगी करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि सर्वांनी या हॅप्पी मेडिकेअर थेरपीचा लाभ घ्यावा आणि आपलं नैसर्गिक पद्धतीने आरोग्य चांगलं करावे.
धनंजय पाटील यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, सातारा जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील, कराड भाजप तालुका अध्यक्ष शंकर शेजवळ, कराड उत्तर उत्पन्न बाजार समितीचे सदस्य उद्धवराव फाळके, किसान मोर्चा कराड अध्यक्ष प्रशांत भोसले, पाल गावचे सरपंच सुनीता घाडगे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच म्हाळसाकांत पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत जाधव, संचालक विश्वास खंडाईत, रमेश जोशी, धनंजय घाडगे, राजेंद्र भोसले तसेच कर्मचारी वृंद ग्रामस्थ यांच्याकडून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
