Home » राजकारण » मोदींचा बहुमान करण्यासाठी उदयनराजेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नांचीं पराकाष्टा करा- श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

मोदींचा बहुमान करण्यासाठी उदयनराजेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नांचीं पराकाष्टा करा- श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा नगरपालिकेतील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी, भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी, माजी नगरसेवक पार्लमेंटरी बोर्ड सदस्य, वृक्ष समिती, न. पा. शिक्षण मंडळ सदस्य तसेच इतर समितीवर असलेले अशासकीय सदस्य व महायुती मधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला.

आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्त्यानां  लोकसभा निवडणुकीसाठी  आवाहन

नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा अशी सूचना आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना केले.

या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम माजी आमदार कांताताई नलावडे, माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेवक अविनाश कदम, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, शिरीष चिटणीस, अमर गायकवाड, निशांत पाटील, निलेश मोरे अशोक मोरे, रंजना रावत, गीतांजली कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, सुजाता राजेमहाडिक, आशा पंडित तसेच आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.

केंद्रातील भाजप सरकारने लोकोपयोगी असंख्य निर्णय घेतले आहेत त्याचा लाभ सातारा शहरासह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना मिळतो आहे. विरोधक खोटे नाटे आरोप करत सुटले आहेत नगरसेवकांनी तीन घेऊन कामाला लागावे नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने काम करता तसंच नियोजनाची वाट न पाहता काम सुरू करा.

भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे आमचा शब्द कधी पडू दिला नाही त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपला ताकद देणे ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. संघर्षामुळे दोन्हीकडे नुकसान होते हे लक्षात आलेले आहे आज काही पालिकेची निवडणूक नाही तर लोकसभा निवडणूक आहे मोदींचा बहुमान करण्यासाठी उदयनराजेंना विजयी करण्यासाठी प्रयत्नांच पराकाष्टा करा, असेही श्री.छ.शिवेंद्रसिंहराचे म्हणाले.

 

 

 

 

पक्ष संभाळता आला नाही त्यात भाजपचा काय दोष?

 

राजकारण म्हटलं की साम दाम दंड भेद या सर्व नीती वापराव्या लागतात. महाविकास आघाडीचे नेते पक्षफोडीचा आरोप भाजपवर लावतात परंतु त्यांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळता आलं नाही त्यात भाजपचा काय दोष आहे ? असा सवाल श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला.

देगाव एमआयडीसी का रोखली ते सांगा?

जिल्ह्यामध्ये मोठी एमआयडीसी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून उभे असलेल्या उमेदवाराने आटापिटा करून देगाव एमआयडीसी होण्यापासून रोखली. विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या जमिनीवरचे शिक्के उठवले गेले वास्तविक डोंगराळ जमिनी चांगला मोबदला देऊन एमआयडीसीसाठी घेतली जाणार होती परंतु मोर्चे काढून निवेदन देऊन त्यांनी एमआयडीसी रोखली निगडी वर्णे येथील प्रस्तावित एमआयडीसीलाही विरोध केला होता परंतु आम्ही मध्यस्थी केल्यामुळे तिथले शिक्के उठवले गेले नाहीत, एमआयडीसी चा प्रकल्प का रोखला याचे उत्तर विरोधकांनी द्यावे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket