Post Views: 49
श्रेया पाटील हिची बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड
सातारा-प्रतिनिधी ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) मध्ये होणाऱ्या मुलींच्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरकडून सातारच्या श्रेया संग्राम पाटील हिची निवड झाली आहे. श्रेया पाटील ही रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर या कॉलेजमध्ये बीसीए या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थ्यांनी आहे. या कॉलेजची ती पहिली बास्केटबॉल युनिव्हर्सिटी प्लेयर असून तिच्या कामगिरीबद्दल संचालक डॉ. बी.एस. सावंत, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. एस. एस. भोला, संगणक विभाग प्रमुख डॉ. आर.डी. कुंभार, क्रिडा शिक्षक अशोक शिंदे , शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले आहे.