Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » शिवराज मोरे प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी

शिवराज मोरे प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी

शिवराज मोरे प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी

कराड -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेस मधील संघटनात्मक पातळीवरील हे महत्वाचे फेरबदल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत. शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांनी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते. 

शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी सांभाळली असून युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती. प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 

एका सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर राज्यभर आपले युवकांचे संघटन वाढवले आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातून युवक काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket