कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » Uncategorized » क्राईम डायरी » शिवथर येथील पूजा जाधव चा खुनी अखेर जेरबंद

शिवथर येथील पूजा जाधव चा खुनी अखेर जेरबंद 

शिवथर येथील पूजा जाधव चा खुनी अखेर जेरबंद 

(सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बारा तासातच केला खूनाचा उलगडा)

शिवथर.(सुनिल साबळे) शिवथर तालुका सातारा येथे सोमवार दिनांक सात रोजी दुपारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींने एका महिलेचा दिवसाढवळ्या गळा चिरून खून केला होता. याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनला ही बातमी समजल्यानंतर तातडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपअधीक्षक राजीव नवले सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे पोलीस उपनिरीक्षक नेवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन खून केलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अवघ्या बारा तासाच्या आत खुन करणारी व्यक्ती ताब्यात घेतली. त्यामुळे सातारा तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे शिवथर परिसरामध्ये आभार व्यक्त केले जात आहे. 

           घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार पूजा जाधव तिचे घर शिवथर गावापासून मालगाव रस्त्याला एक किलोमीटर अंतरावर होते सासू-सासरे शेतामध्ये कामासाठी गेले असता व पती प्रथमेश हा लहान मुलगा शाळेमध्ये सोडून कामाला निघून गेला होता. याचाच फायदा घेऊन दुपारच्या वेळी घरामध्ये कोणी नसताना अक्षय रामचंद्र साबळे वय 27 राहणार शिवथर तालुका सातारा हा घरामध्ये घुसून पूजा जाधव हिचा पहिल्यांदा गळा दाबून नंतर कटरच्या साह्याने गळा चिरुन खून केल्यानंतर तो तेथून पसार झाला होता. परंतु सातारा तालुका पोलीस स्टेशनने दोन टीम (डिबी पथक )तयार करून मोबाईलच्या लोकेशन वरून संशयीतास  पुणे येथील स्वारगेट एसटी स्टँड वरून रात्रीच्या 11 ते साडे अकराच्या दरम्यान ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनला त्याला घेऊन आले. खुनाबाबत त्याला माहिती विचारली असता त्याने खून केलेची कबुली दिली. 

             सातारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उप अधीक्षक राजीव नवले पोलीस निरीक्षक निलेश तांबे पोलीस उपनिरीक्षक नेवसे पोलीस उपनिरीक्षक मोर्डे पीएसआय गुरव हवालदार मालोजी चव्हाण ए एस माने आर जी गोरे कुमठेकर शिखरे वायदंडे फडतरे पांडव दादा स्वामी यांनी खूनाचा तपास करून जलद गतीने यंत्रणा राबवून खुनी ताब्यात घेतला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket