सातारा- जावली मतदारसंघात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवणार आ.शिवेंद्रराजे;
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सदरबझार परिसरातील नागरिकांचा मताधिक्य देण्याचा निर्धार सातारा- गेल्या पाच वर्षात सातारा शहरासह सातारा आणि जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील गाव, वाडी, वस्ती पक्क्या रस्त्याने जोडली गेली आहे. ठिकठिकाणी काँक्रीटचे रस्ते केले आहेत. नळ पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शाळा खोल्या, ग्रामपंचाय कार्यालय इमारत, समाजमंदिर, सभामंडप, व्यायामशाळा आणि साहित्य अशी सर्वप्रकारची कामे झाली आहेत. सातारा- जावली मतदारसंघात विकासगंगा कायम प्रवाहित ठेवून मतदारसंघाचा कायापालट करू, त्यासाठी मला मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा- जावली विधानसभेचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी सातारा शहरातील सदरबझार परिसरातील मोना स्कुल, करी आप्पा चौक, लक्ष्मी टेकडी, लतीफभाई चौधरी घर, पोलीस चौकी, बाजारपेठ, आमणे बंगला, भीमाबाई आंबेडकर चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.
ज्यांनी काडीचेही काम केले नाही अशांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. पाच वर्षात कुठेही न दिसणारे आता इकडे तिकडे फिरून मतांचा जोगवा मागत आहेत. ज्यांना जनाधार नाही, ज्यांचे कर्तृत्व शून्य आहे अशांना आता जनतेचा खोटा कळवळा आला आहे. अशा भामट्यांना त्यांची योग्य जागा सुज्ञ मतदार दाखवून देतील. आपला विजय निश्चित असून सातारकरांनी आपले प्रेम मतांच्या रूपाने दाखवून द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजेंनी केले.
शनिवार दि. ९ रोजी सकाळी ७ वाजता छ. शाहू चौक, कुंभारवाडा, पाटोळे चौक, शंभूराज देसाई बंगला, पोवई नाका, कासट मार्केट, शिकलगार वाडा, तहसील कचेरी, भाजीमंडई, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, वडार वस्ती, पंताचा गोट मैदान, प्रकाश लॉज, प्रिया व्हरायटीज ते शिक्षक बँक अशी पदयात्रा, सायंकाळी ६.३० वाजता भैरवनाथ कॉलनी पिलेश्वरी नगर आणि रात्री ८ वाजता मतकर वस्ती समाजमंदिरा समोर येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
