Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » शिवशक्ती पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

शिवशक्ती पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

शिवशक्ती पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

सातारा प्रतिनिधी -शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि; शिवथर या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १४/०९/२०२५ रोजी कै.आ.डी.वी. कदम सांस्कृतिक सभागृह, आरळे या ठिकाणी उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक मा.चेअरमन श्री. प्रभाकर साबळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्व उपस्थित सन्मानीय सभासद व मान्यवरांचे स्वागत प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन साबळे यांनी केले.

यानंतर संस्थेचे संस्थापक मा. चेअरमनसो यांनी अहवाल सालाअखेर संस्थेच्या सांपत्तिक स्थिती वावत माहिती दिली. त्यामध्ये एकुण भागभांडवल ६ कोटी ८० लाख असून राखीव व इतर सर्व निधी ७ कोटी ८३ लाख, गुंतवणूक ३७ कोटी ३९ लाख, ठेवी ११० कोटी २६ लाख, कर्ज ८० कोटी ७५ लाख आहे. तसेच संस्थेने १००% एन.पी.ए. तरतूद केली आहे. संस्थेच्या संकल्प व शिवआधार योजनेची तसेच सेवकांना व मा. संचालक यांना देण्यात येणा-या प्रशिक्षणाची माहिती दिली. त्याचबरोबर संस्थेस ३५ वर्ष पूर्ण आलेली असून ग्रामीण भागातील या संस्थेने कमी कालावधीत सभासदांच्या आर्थिक गरजा भागविणेचे कामकाज करत सभासदांचा विश्वास संपादन करून नावलौकिक मिळवला आहे. या प्रवासात सहकार्य लाभलेल्या सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, सहकारी संस्था व इतर सहकारी यांचे आभार व्यक्त केले.

सभासदांच्या प्रश्नांना व सुचनांना मा. चेअरमनसो प्रभाकर साबळे यांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. सभेतील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेचे सभासद श्री. सुर्यकांत लोहार यांनी लिखीत स्वरूपात केलेल्या सुचना सभासदांसमोर मांडुन त्यांच्या असणा-या शंकेचे समाधानकारक निरसन केले.

शिवशक्ती पतसंस्थेने आजच्या स्पर्धेच्या युगात CBS प्रणालीचा अवलंब करत QR Code, RTGS, NEFT, SMS सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच व्यापारी व व्यवसायिक ग्राहक बर्गास भांडवल उपलब्ध करून देणेकरीता कर्ज वितरण सुलभ व जलद गतीने होणेसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहचून जागेवरच सर्व पुर्तता करून कर्ज अदा करणेची पद्धत अवलंबली आहे व येणा-या काळात मोबाईल बैंकिंग व e-KYC सुविधा सुरू करणार असलेबाबतची माहिती दिली.

संस्थेचे ज्येष्ठ संस्थापक संचालक मा.श्री. हणमंत साबळे यांनी जनतेचा सहकारावर विश्वास नाही पण सहकाराशिवाय पर्यायही नाही अशी खंत व्यक्त केली. सहकाराशिवाय उन्नती नाही असे प्रत्तिपादन करत संस्थेत असणा-या महिला स्वयं-रोजगार कर्ज, लोकमंगल तारण कर्ज व सोनेतारण कर्ज योजनेबाबतची माहिती दिली. “फक्त ठेवी व कर्ज वाटपातून नफा मिळवणे” एवढेच कार्य संस्था करीत नसून सहकाराबरोबर समाजकारणही केले जाते. त्यातूनच सभासदांना असणा-या विमा योजनेची माहिती देवून कोरोना काळात केलेल्या कामकाजाची व केलेल्या जलसंधारण कामाची माहिती दिली.

सभेस व्हा. चेअरमन श्री. मधुकर नलावडे, संचालक श्री. रमेश साबळे, श्री. विरेंद्र कदम, श्री. भानुदास कदम, श्री. निलेश फाळके, श्री. प्रशांत साबळे, श्री. शशिकांत सावंत, श्री. युवराज कांबळे,संचालिका सौ. शोभा कदम, सौ. रंजना निकम व तज्ञ संचालक श्री. किसन गोडसे उपस्थित होते. तसेच माजी संचालक श्री. शांतीलाल माने, श्री. रामदास साबळे, सल्लागार सभासद श्री. विश्वास साबळे, श्री. दिलीप सोनमळे, श्री. मधुकर घाडगे, श्री. मोहन राजमाने, श्री. संजीव कदम संस्थेचे सभासद श्री. प्रल्हाद साबळे, श्री. प्रभाकर साबळे (सर) श्री. भानुदास साबळे, सौ. नुतन राजेंद्र साबळे, श्रीमती शोभा किरण कदम, श्री रामकृष्ण गाडगीळ, श्री गंगाराम जाधव, श्री नारायण सावंत व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. व्हाईस चेअरमन मधुकर नलवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 6 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket