शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या नूतन इमारतीचे उदघाटन, संस्थेचे प्रशस्त इमारतीत प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवार दि.१७ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
सातारा -शिवशक्ती उद्योग समूह, शिवशक्ती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक प्रभाकर साबळे (दादा) यांच्या नेतृत्वाखाली २०१२ मध्ये शिवशक्ती मल्टीस्टेट संस्थेची स्थापना करण्यात आली. १३ वर्षापूर्वी सुरुवातीस अगदी छोटया जागेत सुरु झालेल्या संस्थेच्या आज स्वमालकीच्या प्रशस्त आणि अद्यावत फर्निचरसह, लॉकर सुविधेसह स्थालंतर होत असताना संसा सभासदांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सहकाराची जाण असलेले दादांच्या माध्यमातून सुरुवातीच्या अवघ्या अडीच वर्षांमध्ये संस्थेचा विस्तार होऊन शिवशक्ती मल्टीस्टेटच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात दहा शाखा व चार विस्तारित कक्ष कार्यरत आहेत. सुरुवातीस स्थापनेसे १६६ सभासद २.६३ लाख भागभांडवल, ठेवी ५० लाख, गुंतवणूक ३२ लाख असलेल्या संस्थेचे आज ५५४४ सभासद, १.५० कोटी भाग भांडवल आहे. संस्थेने १०० कोटीचा टप्पा पार केला असून ९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेचा एकूण व्यवसाय १८० कोटी रुपये आहे. संस्था अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुरु आहे. संस्थेमध्ये आरटीजीएस, एनईएफटी, कोअर बँकिंग, एसएमएस बँकिंग इत्यादी सुविधा लवकरच सुरु होत आहेत. संस्थेमध्ये सोने गहाण तारण, लॉकर सुविधा, महिला स्वयंरोजगार कर्ज, संकल्प ठेव योजना,लॉकर सुविधा इत्यादी सुविधा सुरु आहेत. संस्थेच्या माध्यमातून पात्र कर्जदारांना नियोजनबध्द कर्जवाटप करून त्याचबरोबर कर्ज वसुलीचे हे नियोजन केले जात असते.
सभासद व ग्राहकांना तीर्थक्षेत्र व प्रेक्षणीय स्थळांना सहली करण्याची सुविधा संस्थेने सुरू केली असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संस्था कार्यक्षेत्रातील सर्व छोटा व्यवसायिकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्या कर्ज विषयक गरजा भागवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. संस्था सातत्याने नफ्यामध्ये असून सभासदांना डिव्हीडंटचे वाटप केले जाते तसेच सध्या संस्थेची सुरक्षित गुंतवणूक २५०० कोटी पेक्षा जास्त आहे. शिवशक्ती मल्टीस्टेट संस्थेच्या वाढीसाठी २०१२ ते २०२५ या प्रगतीच्या प्रवासात संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी, संस्थेचे कर्मचारी, ठेवेदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.





