महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक प्रभाग ४ मध्ये शिंदे बंधूंची थेट लढत; ‘ब’ विभागात बिरामणे–वाशिवले यांच्या एकजूटीनं समीकरणे बदलली
महाबळेश्वर :महाबळेश्वर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ सर्वाधिक चर्चेत असून येथे राजकीय चित्र क्षणोक्षणी बदलत आहे. नगराध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदे गटाकडून कुमार गोरखनाथ शिंदे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर , त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुन्नवर हाऊसिंग सोसायटीसह संपूर्ण प्रभागात उत्सुकता वाढली. त्यातच सख्खे भाऊ किरण गोरखनाथ शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरताच प्रभागातील निवडणूक पूर्णपणे भूकंपित झाली असून सर्वत्र कुमार शिंदे ची चर्चा
अ’ विभागात राष्ट्रवादीचे संजय रामचंद्र कदम आणि लोकमित्र जनसेवा आघाडीचे बाळकृष्ण बबन साळुंखे मैदानात उतरले असून तिरंगी नव्हे तर चौरंगी लढत उभी राहिली आहे.
‘ब’ विभागात समीकरणे पालटणारी एकजूट : बिरामणे – वाशिवले
प्रभाग ‘ब’ मध्ये स्थानिकांत लोकप्रिय असलेल्या विमल पांडुरंग बिरामणे यांनी अपक्ष म्हणून दमदार उमेदवारी सादर केली आहे. त्यांच्या शांत, संयमी स्वभावामुळे तसेच वर्षानुवर्षे प्रभागात केलेल्या सामाजिक कामामुळे त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याच विभागात अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शर्मिला हणमंत वाशिवले यांनी अचानक मोठा निर्णय घेत विमल बिरामणे यांना जाहीर पाठिंबा दिला.
वाशिवले यांनी पाठिंब्याची घोषणा करताना म्हटले,
“प्रभागाच्या हिताला प्राधान्य देत, विकासाला चालना देण्यासाठी सक्षम उमेदवारासोबत उभे राहणे गरजेचे आहे. बिरामणे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जोडलेले आहेत. त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टीकोन आणि काम करण्याची तळमळ आहे.”त्यांच्या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पसरला. विमल बिरामणे यांनी वाशिवले यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले,
“शर्मिला ताईंनी दाखविलेला विश्वास ही मोठी ताकद आहे. प्रभाग ४ च्या एकात्मतेचं आणि बदलाचं हे प्रतिक आहे. लोकांचे प्रश्न आणि विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याची आम्ही सामूहिक जबाबदारी स्वीकारतो.”बिरामणे–वाशिवले यांची ही एकजूट प्रभाग ‘ब’ मधील लढत पूर्णपणे बदलणारी ठरली असून, अन्य उमेदवारांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
निवडणूक रंगतदार, प्रभाग ४ पुन्हा चर्चेत
शिंदे बंधूंची थेट लढत, राष्ट्रवादी–लोकमित्रचे उमेदवार, अपक्षांची वाढती ताकद आणि ‘ब’ विभागातील बिरामणे–वाशिवले यांची मजबूत एकजूट या सर्व घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक ४ ही निवडणूक महाबळेश्वरमधील सर्वाधिक रोमहर्षक आणि निर्णायक लढत ठरणार आहे.




