Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन

शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन

शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन

पुणे -पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झाले. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक  अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे.

भारती पवार यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे

Post Views: 41 तंत्र कौशल्ये आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांचाच भविष्यकाळ उज्वल – डॉ.प्रियाताई शिंदे खटावचे सनशाईन स्कूल ठरले जिल्ह्यातील पहिले रोबोटिक

Live Cricket