शाहूपुरीत भजनी मंडळाचा हरिजागर
शाहूपुरी- येथील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये दातेबाई भजनी मंडळामार्फत आयोजित हरिपाठामध्ये १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ३०० महिलांनी हरीचा जागर केला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस दातेबाई भजनी मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा मोरे, हिंदवी पंचकोशाधारीत गुरुकुलच्या संचालिका रमणी कुलकर्णी, हिंदवी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, गुरुकुल प्रमुख संदीप जाधव आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन, तसेच प्रतिमा पूजन करण्यात आले. दातेबाई भजनी मंडळातील महिलांचे हळदीकुंकू देऊन स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थित महिलांना अल्पोपाहार देऊन वाण देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी आणि ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सर्वांना माऊलींच्या रूपात दर्शन देऊन हरिपाठाला सुरुवात झाली. दातेबाई भजनी मंडळातील महिलांनी उत्तमरीत्या हरिपाठाचे त्याचबरोबर विविध भजनांचे गायन केले.





