कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कासचे पाणी, टँकर व वेळापत्रकासाठी शाहूनगरची मागणी; नगरसेविका हेमलता भोसले यांची जीवन प्राधिकरणात धडक

कासचे पाणी, टँकर व वेळापत्रकासाठी शाहूनगरची मागणी; नगरसेविका हेमलता भोसले यांची जीवन प्राधिकरणात धडक

कासचे पाणी, टँकर व वेळापत्रकासाठी शाहूनगरची मागणी; नगरसेविका हेमलता भोसले यांची जीवन प्राधिकरणात धडक

सातारा प्रतिनिधी -शाहूनगर भागाला कास तलावाचे पाणी मिळावे,पाणी सोडण्याचे वेळापत्रक असावे. ज्या दिवशी पाणी येत नाही त्या दिवशी प्राधिकरणाने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा. जागोजागी रस्त्यावरती पाणी वाहत आहे त्याचे लिकेज काढून द्यावे. व नागरिकांकडून लिकेज काढताना पैसे घेऊ नयेत. यासारख्या विविध मागण्यासाठी  प्रभाग क्रमांक 19 च्या नगरसेविका मा. हेमलता सागर भोसले यांनी जीवन प्राधिकरण च्या कार्यालयास भेट देऊन मुख्य अभियंता मा. वाघमारे साहेब यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. 

माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी कासचे पाणी शाहूनगर व सदर बाजार या भागासाठी मिळावे यासाठी विकास आराखडा तयार करण्यास जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्या संदर्भात पुढील काय कारवाई झाली व विकास तयार करण्याचे कामकाज कुठपर्यंत आले आहे याची माहिती घेतली तसेच शाहूनगर मधील नेहमी भेडसावणारा पाणी प्रश्न व त्यासाठी नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा व्हावा याचीही मागणी केली. लिकेजेस काढत असताना कॉन्ट्रॅक्टर कडून मनाप्रमाणे पैसे घेतले जातात . पाणी सोडण्याची कोणतेही वेळापत्रक नाही ते वेळापत्रक तयार करावे अशा मागण्यांसंदर्भात चर्चा केली. 

 मा. वाघमारे साहेब यांनी सकारात्मक उत्तरे देत टँकरची उपायोजना करण्यात येईल तसेच लिकेज काढताना नागरिकांना पैसे द्यायची गरज नाही. पाणी सोडण्याची वेळापत्रक तयार करण्यात येईल. व कास तलावाचे पाणी शाहूनगर व सदर बाजार ला देण्या संदर्भात विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे व तो विकास आराखडा ही लवकरात लवकर नगरपालिकेला सादर केला जाईल अशी आश्वासक उत्तरे मिळाली.

 याप्रसंगी एडवोकेट डी जी बनकर, उपाध्यक्ष सतीश यादव, संजय खुडे, भक्ती जावळे, संगीता जाधव, व शाहूनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket