शाहूनगर मधील पाणी प्रश्न संदर्भात अजित वाघमारे यांच्याशी सागर भोसले यांची चर्चा.
सातारा-नव्याने नियुक्त झालेले जीवन प्राधिकरण चे अभियंता अजित वाघमारे यांच्याशी शाहूनगर मध्ये गेल्या दीड वर्षापासून पाण्या विषयी अनेक भागांमध्ये विविध प्रकारच्या समस्या होत्या त्याचप्रमाणे अनियमित पाणी पुरवठा याची विविध कारणे व त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने जय सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सागर भोसले यांनी चर्चा केली.
त्यास सकारात्मक व अपेक्षित उत्तरे अजित वाघमारे यांच्याकडून मिळाली सर्वच समस्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये निकाली काढण्यासाठी अजित वाघमारे यांनी शब्द दिला. याप्रसंगी जय सोशल फाउंडेशन चे उपाध्यक्ष सतीश जाधव उपस्थित होते. जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शाहूनगर मधील अनेक प्रलंबित कामे सागर भोसले यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास आली आहेत. सीसीटीव्ही असो अथवा स्थानिक अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सागर भोसले यांच्या नेतृत्वात पूर्णत्वास आल्यामुळे शाहूनगरला दत्त वैभव प्राप्त झाले आहे.
