पाचगणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे यांची निवड
पाचगणी प्रतिनिधी – पाचगणी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीवेळी अनिताताई जालिंदर चोपडे व गणेश शांताराम कासुर्डे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली.

या निवड प्रक्रियेसाठी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे,नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, सुप्रिया माने, आकाश बगाडे, राजश्री सणस, परवीन मेमन, माधुरी कासुर्डे, अमित कांबळे, स्वाती कांबळे व शिल्पा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाश गोळे यांच्या निवडीमुळे नगरपालिकेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित नगरसेवकांनी प्रकाश गोळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.




