कराड अर्बन बँकेच्या संचालकपदी उल्हास शेठ यांची निवड
कराड :कराड अर्बन बँकेच्या नैमित्तिक कारणाने रिक्त झालेल्या संचालकपदी कराड येथील सुप्रसिध्द अडत व्यापारी उल्हास तुलशीराम शेठ यांची निवड करण्यात आली. याकामी अध्यासी अधिकारी म्हणून मा. अपर्णा यादव उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांनी कामकाज पाहिले.
याप्रसंगी नूतन संचालक उल्हास शेठ यांचा सत्कार अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे व बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे सन्माननीय सर्व संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




