Home » राज्य » शिक्षण » खेळातून विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वचा विकास होतो – सचिव डी.ए.पाटील

खेळातून विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वचा विकास होतो – सचिव डी.ए.पाटील 

खेळातून विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वचा विकास होतो – सचिव डी. ए.पाटील 

तांबवे – खेळातून विद्यार्थ्यांच्या अंगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गुणांचा विकास होतो.व आपले जीवन समृद्ध करण्यासाठी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजे. असे प्रतिपादन यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव डी ए पाटील यांनी केले. 

वडगांव हवेली ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शाळा स्तरावरील क्रिडा स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पद्मिनी उद्योग समुहाचे प्रमुख सचिन जगताप दादा, मुख्याध्यापिका विजया कदम, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक डी पी पवार,शिक्षक मंगल पाटील,मंगल सकटे,नंदा कराळे ,लालासो कुंभार,मीना पाटील,अश्विनी सांळुखे, शहनाज आवटे, क्रिडा शिक्षकएन.एस.पोळ,ए. एल .लोकरे यांची उपस्थिती होती.        

सचिव डी. ए .पाटील म्हणाले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा परिसर चांगला लाभला आहे. शालेय वयात खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द, चिकाटी निर्माण होते ‌खेळामुळे मुलांच्या मनात नवचैतन्य निर्माण होते.खेळा बरोबर अभ्यास ही केला पाहिजे.यावेळी शाळेला मदत केले बद्दल सचिन जगताप यांचेही कौतुक केले.दरम्यान क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत निवास पोळ यांनी सूत्रसंचालन अनिल लोकरे व आभार ए .एल .पाटील यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket