मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी शाळेला साहित्य वाटप
महाबळेश्वर (प्रतिनिधी) दि ०९ महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसचे औचित्य साधत महाबळेश्वर शहर शिवसेनेच्यावतीने माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या सहकार्याने शहरप्रमुख विजय नायडू यांच्या संकल्पनेतून शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेला साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांनी प्रस्तावना करताना विद्यर्थ्यांना आवश्यक असलेले शालेय साहित्य वाटप कार्यक्रमामागील उद्धेश विशद केला तदनंतर माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अभियान सुरू केले असून या अभियानाचा फायदा सर्वच शाळां सह विद्यार्थ्यांना होणार असल्याचे सांगितले यावेळी शहर शिवसेनेच्यावतीने विद्यर्थ्यांना शाळेला साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक कुमार शिंदे शहरप्रमुख विजय नायडू हेमंत साळवी माजी नगरसेविका सुरेखा आखाडे प्रशांत आखाडे उपजिल्हा महिला संघटिका वनिता जाधव,तालुका संघटिका मेघा चोरगे,शहर संघटक सुनील ढेबे,उपशहरप्रमुख सचिन गुजर,संदेश भिसे,सुरेखा पंडित, प्रभा नायडू किरण मोरे ,सुमित कांबळे अस्लम डांगे आदी उपस्थित होते
