Home » Uncategorized » क्राईम डायरी » सव्वा लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत

सव्वा लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत

सव्वा लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत

वाई प्रतिनिधी( शुभम कोदे)वाई बाजारपेठे मधील रामदेव स्टिल या दुकानात झालेल्या घरफोडीचा गुन्हा वाई गुन्हे शाखेस उघड करण्यात यश आले असून. एक डेक्सटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा व ९० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ११ वा चे दरम्यान वाई बाजारपेठेतील रामदेव स्टिल या भांडयाच्या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेनंतर वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परि पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण पथकासहतात्काळ घटनास्थळास भेट देवुन परिसराची पाहणी केली. व लागलीच

वाई गुन्हे प्रकटीकरण पथकास अज्ञात चोरट्याचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वाई शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना तांत्रिक विश्लेषण तसेच त्यांच्या खास खबऱ्या मार्फत बातमी प्राप्त झाली की, रामदेव स्टिल येथे काम करणाऱ्या विधीसंघर्षित ( अल्पवयीन ) बालकानेच दुकानाचे वरील पत्रा उचकटुन दुकानात प्रवेश करुन दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे ९० हजार रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन चोरुन नेली असल्याचे समजले. त्यानंतर प्रभारी अधिकारी पानेगावकर यांनी सदरच्या विधीसंघर्षित बालकाचा शोध घेवुन त्याचेकडुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिलेनंतर वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरच्या दुकानातील कामगार विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेवुन विचारपुस करुन त्याचेकडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले ९० हजार रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन असा एकुण १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाई पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 300 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket